महाराष्ट्रमुख्यपान

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाणाऱ्या ४ भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक.

गणरायाच्या विसर्जनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात गणेश विसर्जन करण्यात आले. मात्र राज्याच्या काही भागांमध्ये गणेश विसर्जनाच्या दरम्यान काही दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत.
धुळे शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण धडकेत एका चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
तीन वर्षीय चिमुकलीच्या पायावरून टेंपो गेला त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. मात्र, एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरुन टेम्पो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाला. काही वेळातच टेम्पोने रस्त्यावरून जाणाऱ्या या चारही भाविकांना धडक दिली. या भीषण घटनेत ३ वर्षीय सायली जोहरी तसेच तिची आई जस्सी जोहरी आणि पिंकी जोहरी हे तिघेही जखमी झाले आहे घटना घडल्यानंतर टेम्पो चालकाने घटना स्थळाहून पळ काढला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!