वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट

राज्यात पावसाने दमदाट बॅटिंग करायला सुरुवात केलीये. वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. अनेक भागात विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. मुंबईच्या उपनगरीय सखल भागात पाणी साचत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे विसर्जन होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असतानाच आता मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मागील अर्धा तासापासून मुंबई पश्चिम उपनगरातील सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा गोरेगाव या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत