शेजाऱ्याने ६ वर्षांच्या चिमुकलीला केली हत्या.

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. हत्येचं कारण तर तितकच संतापजनक आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने चिमुकलीला पान मसाला आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं. मात्र मुलीने पान मसाला आणण्याऐवजी चिप्स विकत घेतले. याचा आरोपीला राग आल्याने त्याने मुलीची हत्या केली.
मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या दोन भावांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता आरोपी संशयाच्या भोवऱ्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता मुलीचा मृतदेह तिथे सापडला. आरोपीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आणि सांगितले की, त्याने मुलीला 20 रुपये दिले आणि तिला पान मसाला आणण्यासाठी पाठवले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत