देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

फॅशन तुझी आणि माझी!

तुझी फॅशन मुलीसोबत झोपुन
औलाद जन्मास घालनाऱ्या
गंगा आणि ब्रम्हाची..
माझी फॅशन आंबेडकर नावाच्या अफाट श्रमाची…

तुझी फॅशन द्रौपदी नावाच्या स्त्रीचे
वस्त्रहरन करणाऱ्या दुर्योधनाची..
माझी फॅशन स्त्रीला समतेच्या नजरेनी पहणाऱ्या
अलौकिक संविधानाची…

तुझी फॅशन गरोदर पत्नीला संशयी वृत्तीने
वनात सोडणाऱ्या रामाची..
माझी फॅशन समाजासाठी राजरत्नला अर्पण करणाऱ्या
रमा आणि भिमाची…

तुझी फॅशन गोळ्या झाडनाऱ्या
गोडसे नावाच्या हैवानाची..
माझी फॅशन गांधीला जीवनदान देणाऱ्या
प्रचंड विद्वानाची…

तुझी फॅशन दाभोळकर, पानसरेची हत्या करणाऱ्या
हिंसक तत्वाची..
माझी फॅशन भारताला बुद्ध देणाऱ्या
करुणामय बौद्धिसत्वाची…

तुझी फॅशन दंगल घडवणाऱ्या नीच
भिडया आणि किड्याची..
माझी फॅशन जय भीम गर्जनेसह
मानवमुक्तीच्या लढ्याची…

तुझी फॅशन समाजात विष पेरणाऱ्या
रेशिमबागेतल्या हेडगेवाराच्या कुसंघी जातीची..
माझी फॅशन माणुसकीला कवेत घेणाऱ्या
दीक्षाभूमीच्या मातीची…

तुझी फॅशन गुलामीचा विकृत धडा
रोज स्वप्नांत गिरवीनारी..
माझी फॅशन सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणुन
जगभर मिरवीनारी…

होय..
तुझी फॅशन गटार आणि घाणीचे घर..
माझी फॅशन काल, आज आणि उदया..
फक्त प्रज्ञासुर्य आंबेडकर……!!!!

            अ‍ॅड.सचिन मेकाले
              ९७६७६५९५५१

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!