महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दिवंगत विठ्ठल अण्णा पाथरुट यांना भावपूर्ण आदरांजली..

सोलापूर प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दिवंगत विठ्ठल अण्णा पाथरुट यांचे नुकतेच निधन झाले आहे. यानिमित्त शोकसभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, बहुजन विचार मंच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे करण्यात आले होते. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व विठ्ठल अण्णा पाथरुट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर त्रिशरण, पंचशील सामुदायिक पठन करण्यात आले.

विठ्ठल अण्णा पाथरुट यांच्या विषयी बोलताना डॉ अरुणकुमार इंगळे म्हणाले की, विठ्ठल पाथरुट साहेब हे कृतीशील विचारवंत होते.
पाथरुट साहेब हे सेल्स टॅक्स ऑफिसर होते. त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिशय स्नेसपुर्वक वागणूक द्यायचे.त्यांच्या अडचणी सोडवायचे. निष्कलंक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आंबेडकरी चळवळीमध्ये स्वःताला झोकून देऊन काम करायचे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जैन दलितेतर प्रमुख कार्यकर्ते होते त्यामध्ये पाथरुट साहेब हे एक प्रमुख होते.

डॉ एम.डी.शिंदे विठ्ठल पाथरुट साहेब यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, पाथरुट साहेब हे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसेच ते आंबेडकरी चळवळीशी अत्यंत प्रामाणिक होते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.ते विद्वान होते. त्यांचे वाचक दांडगे होते. तसेच ते वेळोवेळी चळवळीबद्दल वर्तमान पत्रातून लेख लिहून कार्यकर्त्यांचे प्रबोधन करायचे. असा एक तळमळीचा कार्रकर्ता आपल्यातून गेल्यामुळे चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल गायकवाड होते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षीताताई कांबळे,मुक्ताताई बनसोडे, आबासाहेब साबळे, अंगद मुके, वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा पल्लवीताई सुरवसे यांनी विठ्ठल पाथरुट साहेब यांच्या विषयी आदरांजली वाहिली.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे यांनी सुत्रसंचलन केले.शाम शिंगे सर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास विठ्ठल पाथरुट यांचे मुले, सुना, नातवंडे उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडी, बहुजन विचार मंच तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!