महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडुन (टिस)पीएचडी करत असलेला विद्यार्थी श्री रामदास के.एस.वर दोन वर्षाच्या निलंबनाची कारवाई .

आजचा म.टा.तील बातमी –
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडुन (टिस)च्या “स्कुल आफ डेव्हलपमेन्ट स्टडीज” मधुन पीएचडी करत असलेला विद्यार्थी श्री रामदास के.एस. याला “केंद्र सरकारकडुन विद्यार्थी विरोधी धोरणे आखली जात असल्याचा आरोप करत नवी दिल्लीत जानेवारी मध्ये झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आयोद्य्येतील राममंदिरामधील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी राम के नाम हा माहितीपट पाहण्याचे आवाहन त्याने केले.अशा आरोपाखाली त्याला १८ एप्रील २०२४ रोजी टिस संस्थेने दोन वर्षाच्या निलंबनाची कारवाई त्याच्यावर केली.
निलंबनाच्या आदेशामुळे रामदासची शिष्यवृत्ती थांबविण्यात आल्याने त्यांना अडचणीशी सामना करावा लागत आहे.अशी याचिका त्याच्या वकीलाने उच्च न्यायालयात सादर केली आहे. असा आहे एक समाज ज्यांना शिक्षण घेण्यासाठीही शिष्यवृत्ती वर अवलंबुन रहावे लागते. तर
आज पंधरा लाखांवुन अधिक विद्यार्थी जगभरातील विद्यापीठांत शिक्षण घेत आहेत. त्यातही सर्वाधिक अमेरिकेला अधिक पसंती दिली जात आहे.तेथील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थी साधारण पंधरा-वीस कमीत कमी खर्च करीत आहे.
भारत सरकारच्या पुढाकारामुळे परदेशात पदवी व पदव्यूत्तर शिक्षणासाठी जाणा-या उमेवारांना ब्यांका कर्जे उपलब्ध करुन देत असल्याने होतकरु विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. असा हा भारतातील दुसरा समाज वर्ग आहे.
सांगण्याचा हेतु हा आहे की,दोन्ही बातम्या आजच्याच म.टा.मधील आहेत. एक वर्ग शिष्यवृत्ती वर शिक्षण घेण्यासाठी मजबुर आहे,तर दुसरा वर्ग भारत सरकारच्या पुढाकारानं लाखो रुपये कर्ज घेवुन परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातो आहे.
भारतातील ही शैक्षणिक अवस्था किती विषम प्रवृत्तीची आहे याचे हे ठळक उदाहरण आहे.म्हणुनच समाजाने शैक्षणिक संस्था निर्माण करुन समाजाची शैक्षणिक प्रगतीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. केवळ राजकारण करुन ही समस्या सुटणारी नाही. दोन-चार खासदार किंवा आमदार काही करु शकत नाही. समाजाने एक होऊनच शिक्षण या क्षेत्राकडे विकासाच्या दृष्टीने गांभीर्याने चिंतन करण्याची गरज आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!