दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बौद्ध समाजातील तरुण विक्रम दादासाहेब गायकवाड यांचा आंतरजातीय विवाह केला म्हणून खून

बौद्ध समाजातील तरुण विक्रम दादासाहेब गायकवाड यांचा आंतरजातीय विवाह केला म्हणून खूनच – अनुसूचित जाती जमाती आयोगाचे व गाव तंटा मुक्ती अध्यक्ष यांचे मत – मुख्यमंत्री यांनी एस आय टी नियुक्ती करून फेर तपास करावा
भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे यांची मागणी


आज रोजी २८ फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मु पो उत्तरोली ता भोर जिल्हा पुणे येथील बौद्ध समाजातील तरुण विक्रम दादासाहेब गायकवाड वय २९ या एम एस सी पास झालेला बागायती शेतकरी यांनी मराठा समाजातील शेजारील गाव कान्हवडी ता खंडाळा जिल्हा सातारा येथील मुलगी स्नेहा संदीप चव्हाण यांचेशी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता यामुळे जातीय द्वेष भावनेने चिडून जाऊन संगनमताने कट रचला व त्याचा अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली पण पोलिसांनी या प्रकरणी आमदार व नामदार यांचे दडपणाने खरी घटना व खरे आरोपी यांना वाचविणे साठी चुकीची फिर्याद दाखल केली याबाबत आज २८ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जाती जमाती आयोग चे सचिव मेश्राम सो मुंबई ; मा विशाल लोंढे सो; सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय जिल्हा पुणे व उप अधीक्षक पोलिस श्री बर्डे सो असे अनेक अधिकारी गावी जाऊन फिर्यादी ; संबंधित लोक घटनास्थळी भेट दिली त्यांची माहिती घेतली ; पोलीस अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली यावेळी गाव तंटा मुक्ती अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांचेशी चर्चा केली त्यांनीही या खून प्रकरणी मुलीचे कुटुंब यांचेशी झालेली चर्चा काय झाली हे सांगितले त्यांनी हा आंतरजातीय विवाह खून आहे सांगितले यावर सर्व संबंधित अधिकारी यांचेकडे गुन्हा फेर तपास करावा यासाठी एस आय टी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली या प्रमाणे शासनास अहवाल सादर करण्यात येईल असे मा मेश्राम सो मुंबई यांनी सांगितले तरी देखील तात्काळ कारवाई करण्यासाठी आंबेडकरी सर्व संघटना यांनी निवेदन ; आंदोलन व उपोषण करून दबाव निर्माण केला पाहिजे या भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे असे पत्रक काढण्यात आले आहे या प्रकरणी नामदार मा श्री अजितदादा संपर्क मंत्री व तालुका आमदार शंकर मांडेकर हे या प्रकरणी का गप्प आहेत? भेटही घेतली नाही ; आरोपींना मदत करतात काय ? असे आंबेडकरी जनतेची प्रतिक्रिया आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!