निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणुकीत आंबेडकरी समाजाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येकात स्पर्धा लागली होती

आंबेडकरी समाजाची मानसिकता
देशातील लोकसभेच्या निवडणुका होऊन निकाल जाहिर झाला. पुन्हा प्रधान मंत्री पदावर नरेन्द्र मोदी आरूढ झाले. ज्यांच्या विरोधात संपूर्ण देशात वादळ उठविण्याचा प्रयत्न केला गेला.व काही झाले तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊ द्यायचे नाही असा निर्धार करून सर्व पुरोगामी व भाजपा विरोधी पक्षांनी निवडणुकीत प्रचारात जोर लावला. भाजपाच्या एकहाती सत्ता येऊ दिली नाही तर .तर समविचारी लोकाची मोट बांधून सरकार स्थापन करावे लागले.भाजप ला रोखण्यात जनतेला यश आले आहे
लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी प्रचार माध्यमांचा उपयोग करण्यात आला.फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून लोकांची मतदारांची मोदी विरोधी मानसिकता तयार झाली.
आंबेडकरी मतदारांनी मोलाची कामगिरी केली
देशात धार्मिक कट्टरता वाद निर्माण करुन हा देश एका विशिष्ट धर्माचा असल्याचा आभास निर्माण केला गेला. त्यांचा विरोध म्हणून आंबेडकरी जनतेने मतदान केले.
प्रत्येक राजकिय पक्षांनी निळा झेंडा व बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. प्रत्येकाची होड लागली होती की मी कसा आंबेडकर निष्ठ आहे. काँग्रेस भाजपा शिवसेना राष्ट्रवादी सर्वच पक्षांनी आपली श्रद्धा बाबासाहेब आंबेडकर प्रती अर्पित केली. आंबेडकरी समाजाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येकात स्पर्धा लागली होती. निवडणूक संपली.आबेडकरी समाजांचे प्रश्न आवासून उभे आहेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे विदेशात शिक्षण घेण्यास जी आर्थिक मदत दिली जात होती तीला कात्री लावली गेली.
आजही ग्रामीण भागात आंबेडकर पुतळा बसविण्यात बोध विहार बांधण्यास अडथळे निर्माण केले जाते. देवीच्या हनुमानाचे गणपतीचे मंदिर उभारण्यासाठी कोणतिही परवानगी लागत नाही सरकारी जागेवर अतिक्रमण केले जाते त्याला कैणताही अडथळा नाही.परतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाबसविणयास परवानगी नाकारली जाते. मत घेतांना आंबेडकरी मते चालतात.परतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास किंवा विहारात येतील ओबीसी समाज विरोध करुन प्रस्थापित व्यवस्थेच्या लोकांना मदत करीत असतात.
प्रश्न आहे की निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार केला जातो मत मांगितले जाते त्याप्रमाणे उपरोक्त प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी याकडे लक्ष देईल काय व समाजात तेढ निर्माण करणारे याच्या विरोधात उभी राहील काय
विनायकराव जामगडे 7823093556
9372456389
निळा झेंडा व बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचा वापर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!