महाराष्ट्रमुख्यपान

उपरवाही त. कोरपना जि. चंद्रपूर येथे उपरवाही ते गडचांदूर संविधान सन्मान पथमार्च आयोजनाच्या संदर्भात बैठकीचे आयोजन

मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ ला उपरवाही त. कोरपना जि. चंद्रपूर येथे आयु. मारोती झोडे यांचें राहते घरी उपरवाही निवासी रामदास रामटेके, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

बुद्ध वंदना घेऊन बैठकीची सुरूवात करण्यात आली. अशोककुमार उमरे, सुरज उपरे, वारलु नळे, उमाकांत वाघमारे यांनी पैदल संविधान सन्मान पथमार्चचे उद्देश अवगत केले.

बैठकीत दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला उपरवाही ते गडचांदूर संविधान सन्मान पथमार्च काढण्याच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आले. सर्व उपस्थितांनी एकमताने उपरवाही ते गडचांदूर असा पैदल संविधान सन्मान पथमार्च ठरविण्यात आले.

बैठकीचे संचालन आणि आभार सुरज उपरे यांनी केले. बैठकीनंतर अशोककुमार उमरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे संविधान आणि बाबासाहेबांनी सर्व भारतीयांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्यासाठी आवाहन केलेले प्रकटपत्र उपस्थितांना वितरित केले.

बैठकीला अशोककुमार उमरे, गडचांदूर, वारलू नळे, धामणगाव, सुरज उपरे हरदोना, उमाकांत वाघमारे, चिंचोली, रामदास रामटेके, उपरवाही, हंसराज ताकसांडे, उपरवाही, बुद्धेश्वर गोरडवार, नामदेव चुनारकर, प्रमोद झाडे, चंदुजी देठे, मुन्ना मेश्राम, विकास मोहुर्ले, मारोती ताकसांडे, संगीता मारोती झोडे, हर्षल ताकसांडे, अनुष शेंडे, ज्योती दुर्गे, अर्चना रामटेके, अंजू डोमाजी ताकसांडे, सुनंदा रामटेके, नीता चुनारकर, गौतम गोंडाने इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!