
खातो तो घास …. आंबेडकर,
घेतो तो श्वास …. आंबेडकर,
पाळण्याची दोरी …. आंबेडकर,
आईचे अंगाई गीत …. आंबेडकर,
रमाई चे मंगळसुत्र…. आंबेडकर,
बहिणीचा पाठीराखा …. आंबेडकर,
हरिणाची करुणा …. आंबेडकर,
बापाचा मजबूत खांदा …. आंबेडकर,
सांग कुठे वजा करू मी आंबेडकर….
विषमतेला बसलेली पाचर …. आंबेडकर,
मशालीची धग …. आंबेडकर,
मनगटाची रग …. आंबेडकर,
डफावरील थाप …. आंबेडकर,
क्रांतीचे गीत …. आंबेडकर,
वाघाची डरकाळी …. आंबेडकर,
क्रांतीची ललकार …. आंबेडकर,
विजांचा कडकडाट …. आंबेडकर,
गरुडाची भरारी …. आंबेडकर,
एकतेची वज्रमुठ …. आंबेडकर,
मनूची कबर …. आंबेडकर,
छातीचा कोट …. आंबेडकर,
पाठीची ढाल …. आंबेडकर,
येवल्याची गर्जना …. आंबेडकर,
महाडचा संगर…. आंबेडकर,
सांग कुठे वजा करू मी आंबेडकर….
केंब्रिज, कोलंबिया युनिव्हर्सिटीचा डायमंड …. आंबेडकर,
ज्ञानाचे प्रतीक …. आंबेडकर,
वाऱ्याची झुळूक …. आंबेडकर,
न्यायाचं प्रतिक आंबेडकर….
समतेचे गीत …. आंबेडकर,
दिव्याची वात …. आंबेडकर,
मुक्त आकाशाचे स्वातंत्र्य …. आंबेडकर,
गवताच्या पात्यावरील दवबिंदू …. आंबेडकर,
पक्षाच्या चोचीतील दाणा …. आंबेडकर,
देशाचा मुकुटमणी …. आंबेडकर,
अखंडतेचा शिल्पकार …. आंबेडकर,
दबलेल्यांचा आवाज …. आंबेडकर,
वाड्या तांड्यावरील हुंकार ….आंबेडकर,
नाग भूमीचा निनाद …. आंबेडकर,
चातकाची तहान …. आंबेडकर,
सांग कुठे वजा करू मी आंबेडकर….,
झोपडीतील दिवा …. आंबेडकर,
माझ्या हृदयाचं स्पंदन …. आंबेडकर,
आम्हा सर्वांचं अस्तित्व …. आंबेडकर,
आमचं जगणं …. आंबेडकर,
आमचं मरणं …. आंबेडकर,
वामनदादांची गोड वाणी …आंबेडकर,
माझी लेखणी …. आंबेडकर,
माझे हे गीत …. आंबेडकर,
सांग कुठे वजा करू मी आंबेडकर.
आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर
यत्र,तत्र,सर्वत्र आंबेडकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत