महाराष्ट्र

मुलीला तिच्या कुटुंबीयांनी जाळून मारण्याचा प्रयत्न.


एका 23 वर्षीय तरुणीचे तिच्या गावातील एका तरुणासोबत संबंध होते. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. घरच्यांना हा प्रकार कळताच ते संतापले. जेव्हा त्यांनी तिची चाचणी केली तेव्हा गर्भधारणेची बातमी खरी ठरली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला जंगलात नेले आणि जिवंत जाळण्याच्या उद्देशाने तिच्या पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले.
या घटनेत मुलीची आई आणि भावाचा हात असल्याचा आरोप आहे. त्यांनी मुलीवर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले. त्यामुळे ती 70 टक्के भाजली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे.
मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. सध्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबधित घटनेची कायदेशीर कारवाई केली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!