
आंबेडकरी जनतेचा खडा सवाल….
महादू पवार
पत्रकार, मुंबई
9867906135
मुंबई, संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण देशभर त्याचा जाहीर निषेध, निदर्शने, आंदोलने केली जात आहेत. देशामध्ये दलित, आंबेडकरी जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती गप्प का आहेत? असा खडा सवाल महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ देशातील अनुसूचित जाती जमाती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार राजीनामा देणार आहेत का? असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांनी करून अमित शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
रिपब्लिकन आंबेडकरी जनतेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांच्या नावाची फॅशन झालेली आहे, असे वक्तव्य करून दलित आंबेडकरी जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. ही घटना अत्यंत निषेधार्थ असून केंद्रीय गृहमंत्र्याकडून असे अवमानकारक वक्तव्य हे महापुरुषांचे अवहेलना करणारे आहे ,त्यामुळे या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीतील घटक पक्ष माजी मंत्री सुरेखा कुंभारे, पीपल्स पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जोगेंद्र कवाडे, युनायटेड पक्षाचे तानसेन ननावरे, रिपाई नेते दिलीप जगताप, रिपब्लिकन डेमोक्रॅटिकचे कनिष्क कांबळे, विविध रिपब्लिकन पक्ष संघटना या वादग्रस्त वक्तव्यावर मूग गिळून गप्प का आहेत? अमित शहा यांनी संपूर्ण देशाची आणि आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांनी केली आहे. लोकसभेमध्ये राखीव मतदारसंघातून निवडून गेलेले एससी ,एसटीचे खासदार राजीनामा देऊन या घटनेचा निषेध करणार आहेत का? त्याबाबत ते स्पष्ट भूमिका जाहीर करणार आहे का? असा सवाल ही सुरेश बारशिंगे यांनी उपस्थित केल्याने केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मित्रपक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करू लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत