देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मग हिंदू मंदिरांच्या खाली बुद्धांची धार्मिक स्थळे आहेत त्याचे काय ….?

🔲 मग हिंदू मंदिरांच्या खाली बुद्धांची धार्मिक स्थळे आहेत त्याचे काय ….? असा खणखणीत सवाल करणारी इंटरवेंशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल……

▪️बुधवार , १८ डिसेंबर २०२४.
▪️डॉ. संजय दाभाडे , पुणे.
9823529505

उत्तर प्रदेशातील ‘ संभल मशीद ’ केस सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे नी त्यामध्ये तामिळनाडूचे खासदार थोर थालीवलीवान यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. दिशा वाडेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाचे इंटरवेंशन दाखल केले आहे.

ह्या मशिदी खाली मंदिर असल्याचे व ते शोधण्या साठी पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करण्यास मान्यता देणारे आदेश खालच्या कोर्टाने दिले होते. तसेच ह्यानिमित्ताने “ पलेसेस ऑफ वर्षीप कायदा १९९१ “ ला हिंदूत्व वाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. अर्थात ह्या आगाऊपणाला सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे.

बाबरी मशीद व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांची १९५० पूर्वीची परिस्थिती जैसे थे च राहिल असे आश्वासन देणारा हा कायदा आहे. हिंदुत्ववाद्यांचा त्यास आक्षेप आहे….त्यांना सर्व पुरातन मशीदीखाली मंदिरे आहेत असे म्हणून देशात धार्मिक तणाव कायम ठेवायचा आहे.

त्या निमित्ताने देशातील बुद्धिस्ट समूहाचे म्हणणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बुद्धिस्ट समूहाचे म्हणणे असे आहे की अनेक प्राचीन हिंदू मंदिरे बौद्ध धार्मिक स्थळांवर बांधलेले आहेत…त्

याचे काय …..?
सदरील इंटरवेंशन याचिकेत हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

सदरच्या कायद्याला रद्द केल्यास असे अनेक प्रश्न उपस्थित होतील असे ह्या इंटरवेंशन याचिकेत म्हटले आहे. हिंदुत्व वाद्यांना आव्हान देणारी ही महत्त्वपूर्ण भूमीका ह्या इंटरवेंशन याचिकेत घेण्यात आली असून सदरचा पलेसेस ऑफ वर्षीप कायदा १९९१ आहे तसा कायम ठेवावा ही महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

ऍड. दिशा वाडेकर ह्या इंटरवेंशन याचिकेत मोठी भूमिका पार पाडत आहेत.

▪️डॉ. संजय दाभाडे , पुणे. 9823529505
sanjayaadim@gmail.com

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!