देश-विदेशमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

‘चैत्यभूमी’ माहितीपटाची लंडनमध्ये स्क्रिनिंग होणार.

दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा माहितीपट ‘चैत्यभूमी’ पहिल्या आंतरराष्ट्रीय स्क्रिनिंगसाठी सज्ज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे धडे गिरवलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हे स्क्रिनिंग होणार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हे स्क्रिनिंग होईल. दरम्यान मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाने चित्रपट निर्माते आणि TISS स्कॉलर सोमनाथ वाघमारे यांना LSE मध्ये त्यांची ‘चैत्यभूमी’ ही डॉक्युमेंट्री दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे.

‘चैत्यभूमी’चे दिग्दर्शन सोमनाथ वाघमारे यांनी केले असून तामिळ चित्रपट निर्माते पा. रंजित यांच्या नीलम प्रॉडक्शनने या लघुपटाची प्रस्तुती केली आहे. हा म्युझिकल सिनेमा मुंबईतील चैत्यभूमीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी अंतिम संस्कार झाले होते. भारतातील दलित चळवळीसाठी एक महत्त्वपूर्ण पवित्र स्थान असलेल्या चैत्यभूमीला ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेल्याने एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. लघूपटात याविषयीच भाष्य केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!