नास्तिक असण्याचे फायदे
👉🏻1. भुतांची अजिबात भीती नाही.
👉🏻2. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.
👉🏻3. केस कापताना “आज कुठला वार आहे?”, ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.
👉🏻4. घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.
👉🏻6. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !
👉🏻7. मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.
👉🏻8. लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात.
👉🏻9. बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.
👉🏻10. पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी भांडण्याची गरजच काय नाही.
👉🏻11. उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.
👉🏻12. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.
👉🏻13. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.
👉🏻14 कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेवून झोपता येते.
👉🏻16. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.
👉🏻17. सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.
👉🏻18 कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते… !
👉🏻19 धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.
👉🏻20 प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.
👉🏻21. “मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?” या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.
👉🏻22. रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…
👉🏻23. दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.
👉🏻24 घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्या कुणाला स्वयंघोषित ‘माझी आई – माझा बाप’ बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही
.
👉🏻25 चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते…
डोकं गहाण ठेवून कुण्या बुवाबाबांच्या नादाला लागण्याची
आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या मूर्खपणाची खात्री पटवून देण्याची गरज नसते.
👉🏻26. स्वतःचे कष्टाचे पैसे वायफळ प्रवास खर्च” करण्यापासून वाचवता येतात.
पुजार्याचे पोट भरण्यापेक्षा स्वत: चा कामामध्ये करता येते. त्या पैशाचा सदुपयोग करून आपला सर्वांगीण विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
थोडक्यात या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
जी
शशिकांत वाकोडे
लता वाकोडे
सम्यक संबूद्ध का app आ गया है ।
सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत