देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान

तंबाखूमुळे सात देशांमध्ये दरवर्षी १३ लाख जणांचा मृत्यू.

लॅन्सेट’च्या ‘ई-क्लिनिकल मेडिसिन’मध्ये प्रकाशित संशोधनातील माहिती नुसार भारतासह सात देशांत दरवर्षी १३ लाखपेक्षा अधिक जणांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. ‘संशोधकांनी सांगितले की, कर्करोगामुळे दरवर्षी जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी अर्ध्यापेक्षा अधिक मृत्यू हे भारत, चीन, ब्राझील, ब्रिटन, रशिया, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील असतात. धूम्रपानासह मद्यपान, लठ्ठपणा आणि ‘ह्युमन पेपिलोमा व्हायरस’मुळे (एचपीव्ही) दरवर्षी २० लाख लोकांचा मृत्यू होतो.

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, क्वीन मेरी लंडन युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनमधील किंग्ज कॉलेजच्या तज्ज्ञांनी हे एकत्र संशोधन केले आहे. क्वीन मेरी लंडन युनिव्हर्सिटीचे प्रा. ज्युडीथ ऑफमॅन यांनी सांगितले की, तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे; परंतु सध्या गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यूही गंभीर बाब आहे. जगभरात प्रत्येक दोन मिनिटांत एका महिलेचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. यामधील ९० टक्के मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!