दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान

भारताच्या लष्कराच्या तिन्ही दलाच्या संयुक्त रणणितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक करण्यात आली…


हा हल्ला यशस्वी होता, लष्कर इथे थांबले नाही तर देशात धार्मिक उन्माद घडवून देशात अराजकता माजवू पहाणाऱ्या विचारधारेला तसंच पाकिस्तानातून येऊन भारतात धार्मिक विद्वेष पसरू पहाणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मनसुब्यावर सुद्धा जोरदार स्ट्राईक केला…
भारतीय लष्कराने भारतीय असल्याची जवाबदारी खुप इमानेइतबारे निभावली…
दोन महिला अधिकाऱ्यांना त्यांनी ब्रिफींगसाठी बोलावले हया कृतीतून त्यांनी खुप सकारात्मक संदेश देशातील जनतेला दिला..
त्यांनंतर मोदी सरकारच्या चमकून लोकांना माईकसमोर उभे न करता त्यांनी विदेश सचिव विक्रम मिसरी यांना निवेदन करण्यासाठी सांगितले…
विक्रम मिसरी साहेबांनी ज्या पद्धतीने मांडणी केली, लष्कराची भूमिका सांगितली ती खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची भूमिका होती…
देशात धार्मिक विद्वेष पसरविण्यासाठी आतंकवाद्यानी धर्म विचारून लोकांना मारले…
आणि लष्कर धर्मासाठी नाही तर देशासाठी हे ऑपरेशन यशस्वी केले.
पहलगाममध्ये पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहॆ, स्थानिकाना रोजगार उपलब्ध झाला आहॆ हे सर्व ज्यांना पहावत नव्हते त्यांनी धार्मिक द्वेष पसरवून तिथला पर्यटन व्यवसाय मुळासाकट उपटून टाकण्यासाठी प्रयत्न केला पण भारतीयानी दहशतवाद्याचा हा मनसूबा उधळून लावला आहॆ. काही लोकांनी धर्माच्या आधारे देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी
” जाती नही धर्म पूछकर गोली मारी है ” असल्या धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्या टॅग लाईन घेऊन भारतीय मुस्लिमांना टार्गेट करने त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, हया हल्ल्याला तेच जवाबदार आहेत अस चित्र रेखाटून त्यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला होता तो लष्कराने पुरता हाणून पाडला…
” तुमने धर्म पूछकर गोली मारी, हम धर्म बताकर तुमको मारेंगे ” असल्या फुटकळ टॅग लाईन वापरून लष्कराच्या पराक्रमाला काळे फासण्याचा जो प्रयत्न केला तोही हाणून पाडला…
गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा अस घडताना दिसले की लष्करी कारवाईनंतर संबंधित अधिकारी मीडिया समोर येऊन बोलले, भूमिका मांडण्यासाठी विदेश सचिवाना पाचारण केले…
नाहीतर असा मौका मन की बात करण्यासाठी तत्पर असणारा व्यक्ती सोडणार थोडीच होता…
पण ह्यावेळी लष्कराने न बोलता संदेश दिला…
आता नाही शांत बसा, काय बोलायचे ते आम्ही बोलू…
😎😎😎

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!