
गणेश उत्सवामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे मात्र झेंडू फुले उत्पादन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. किरकोळ खरेदी दारांकडून झेंडूच्या फुलांची मोठी मागणी होत आहे. मागील एक महिना झेंडूच्या फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र आता झेंडूला 50 ते 60 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे
बारामती तालुक्यातील झारगडवाडी, डोरलेवाडी या भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू या फुलांची ठिबक, मल्चिंग आदीचा वापर करून आधुनिक पद्धतीने लागवड करतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत