महाराष्ट्रमुख्यपान

धनगर आरक्षणासाठी नगर- कल्याण महामार्गावर रास्ता राेकाे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज (शुक्रवार) नगर- कल्याण महामार्गावर धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिणामी नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गेल्या 17 दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील सखल धनगर समाजाच्या वतीने हे आंदाेलन छेडण्यात आले.
आंदाेलकांनी मेंढपाळांसह सुमारे एक तास नगर कल्याण महामार्गावरील ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी सरकारचा निषेध केला. सरकारने येत्या चार ते पाच दिवसात आरक्षणाविषयी जर तोडगा काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!