शिवरायांची मुद्रा राज्याच्या पायावर तक्रार दाखल.

छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याप्रकरणी लालबाग चा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल कण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा ने मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कडे मुंबई तक्रार दाखल केली.
लालबागचा राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही बाब अनेकांना खटकली. सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्याकडून मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागचा राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा या पाठीमागचा हेतू शिवअनुयायांना कळालेला नाही. या कृतीने लालबागचा राजा मंडळाने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. गणपती बाप्पा जरी देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. त्यामुळे ही राजमुद्रा त्यांच्या पायावर असणे पटत नाही म्हणून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१७ सप्टेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “लालबागचा राजा मंडळाने जे केलं ते आज सकाळी माझ्याही कानावर आलं. मात्र, त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. त्यांनी दुरुस्ती केली असेल, तर हा विषय संपवुया असं मला वाटतं. त्यावेळी मराठा क्रांती महामोर्चाची मागणी रास्त होती. असं काही केलं की भावना दुखावतात.”
“एवढ्या मोठ्या मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणं गरजेचं आहे. अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,” असंही संभाजीराजे छत्रपतींनी नमूद केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत