प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
भीमाकोरेगाव प्रकरणी तपास एकाच बाजूने सुरु असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात भीमा कोरेगाव आयोगासमोर आज साक्ष झाली. यावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या आधीच आयोगाकडे माझे शपथपत्र सादर केले आहे. त्याचे काय झाले? आणि यामध्ये कुणाची चौकशी करणे आवश्यक आहे? आणि कोणाची होत आहे.
आज आयोगासमोर दाखल झालेल्या पुराव्याच्या आधारे, उलट तपासणी होणार आहे. परंतु हे एकाच बाजूने सगळं चाललेलं दिसत आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत