महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदड पडण्यास शरद पवार सज्ज.


शरद पवार गटाच्या या कार्यालयात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समधून अजित पवारांचा फोटो वगळण्यात आले आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे कार्यालयात उभारण्यात आलं आहे. या कार्यालयामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं वर्चस्व आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सगळं पाहून आता शरद पवार गटाने देखील कार्यालय उभारलं आहे.

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलंबित करण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट दोन हात करायला सज्ज झाला आहे. यासाठीच शरद पवारांच्या गटाने पिंपरी-चिंचवड स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. काळेवाडी परिसरात हे कार्यालय उभारलं आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन केलं जाईल.

3 जुलैला शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही तीन महिन्यांमध्ये मुख्य राष्ट्रवादीत परत या. अनेक कार्यकर्त्यांना शरद पवारांनी डेडलाईनही दिली होती. आता शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेली डेडलाईन संपत आली. सर्व कार्यकर्त्यांसाठी शरद पवार राबले, याचा सन्मान ठेवून कार्यकर्ते परत येतील असं वाटलं होतं. मात्र एकही कार्यकर्ता परत आला नाही, हे दुर्दैव आहे. त्यानंतर शहरातील मूळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालय उभारलं आहे आणि याच कार्यालयातून आता राष्ट्रवादीचं पुढचं कार्य चालणार आहे, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितलं आहे.

यासंदर्भात जयदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आमदार रोहित पवारही पिंपरी-चिंचवडच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून गेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे फोनवरुन आमच्याशी संपर्कात आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि शरद पवार हे या कार्यालयाच्या उद्घाटनाला येऊ शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आता शरद पवारांसोबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी फळी उपस्थित राहते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!