स्वातंत्र्य
रामचंद्र सालेकर
“स्वातंत्र्य म्हणजे पर दास्यातून मुक्ती, सोप्या भाषेत गुलामीतून मुक्तता होय. गुलामी ही भौगोलिक, शारीरिक आणि मानसिक (बौद्धिक) अशा तीन प्रकारची असते. भौगोलिक स्वतंत्रता म्हणजे आपल्या वास्तव्यचा प्रदेशावर आपला अधिकार प्रस्थापित होणे, शारीरिक म्हणजे आपल्या शारीरिक कृतिवर जी बंधन असतील ती दूर होणे जसे शारीरिक त्रासातून किंवा कैदेतून मुक्त होणे,
मानसिक गुलामी म्हणजे आपल्या मेंदूच (बुद्धीच) संचलन करणारा दुसरा असेल त्यात आपण मानलेला एखादा गुरु किंवा आपल्या मेंदू(मनावर)वर ज्या गोष्टी घट्ट बसल्या आहे त्या योग्य की अयोग्य हा विचार करण्याची क्षमता नष्ट होणे म्हणजे मानसिक गुलामी. यात तिसरी मानसिक गुलामी सर्वात धोकादायक आहे, तेवढंच यातून मुक्त होणेही सर्वात कठीण आहे जो यातून मुक्त झाला तो खरा स्वतंत्र्य.या तीनही गुलामीतून मुक्त होणे म्हणजे खरं स्वातंत्र होय.”
✒️ रामचंद्र सालेकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत