बार्टी कडून प्रशिक्षणासाठी १४० कोटी रुपयांहून अधिक खर्च

२,७५० उमेदवारांची सेवेत निवड , संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) IBPS परीक्षांसाठी मार्गदर्शन उपक्रमावर गेल्या आठ वर्षांत १४० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्यात २८ हजार ३५० उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले असून, २०१८-१९पर्यंत दोन हजार ७५० उमेदवारांची शासकीय- निमशासकीय सेवेत निवड झाली. आठ वर्षांतील सर्वाधिक ९० कोटी रुपये गेल्या दोन वर्षांत खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
कुलदीप आंबेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत बार्टीकडे आयबीपीएस परीक्षांसाठी मार्गदर्शन उपक्रमाची माहिती मागितली होती. त्याला बार्टीकडून मिळालेल्या उत्तरातून ही स्थिती समोर आली आहे. राज्यातील ३७ प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून IBPS परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यात २०१५-१६मध्ये एक हजार १५० उमेदवारांसाठी तीन कोटी ३३ लाख ५० हजार रुपये, २०१६-१७मध्ये दोन हजार ७०० उमेदवारांसाठी सहा कोटी ६७६ लाख रुपये, २०१७-१८मध्ये एक हजार ८०० उमेदवारांसाठी तीन कोटी ३३ लाख ५० हजार रुपये, २०१८-१९मध्ये नऊ हजार १०० उमेदवारांसाठी २७ कोटी ३० लाख रुपये, २०१९-२०मध्ये चार हजार ६०० उमेदवारांसाठी १३ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले. सन २०२०-२१मध्ये करोनामुळे प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.
२०२१-२२ मध्ये चार हजार ५०० उमेदवारांसाठी ४५ कोटी रुपये, तर २०२२-२३मध्ये चार हजार ५०० उमेदवारांसाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमातून २०१८- १९पर्यंत २० टक्के उमेदवारांची, म्हणजेच दोन हजार ७५९ उमेदवारांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आठ वर्षांत आलेल्या खर्चातील सर्वाधिक ९० कोटी रुपये खर्च दोन वर्षांत करण्यात आला. त्याच वेळी दोन वर्षांतील उमेदवारांच्या संख्येपेक्षा २०१८- १९मध्ये विद्यार्थिसंख्या जास्त असूनही त्या वर्षीचा खर्च दोन वर्षांपेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बार्टीतर्फे IBPS परीक्षा प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे समोर आले. मात्र त्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे यूपीएससी-एमपीएससीच्या तुलनेत आयबीपीएसच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कोणाच्या भल्यासाठी चालवला जातो, असा प्रश्न उपस्थित आंबेकर
यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत