भगवा” ही सुद्धा बुद्धाचीच देन आहे.
डॉ. आ. ह. साळुंके
पाली वाङ्मयात बुद्धांना पुनःपुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे ‘भगवा’,
भगवा म्हणजे ‘उत्तम गुणांनी संपन्न. या शब्दाचे मुळ रूप ‘भगवत्’ असे आहे. ‘भगवा’ हे त्याचे प्रथमा विभक्तिमधील एकवचन होय.
संस्कृतमध्ये ‘भगवान्’ असे रूप वापरले जात असले, तरी पालीमध्ये ‘भगवा’ हेच वापरल्रे जाते. मुळ त्रिपिटकात भगवा हा शब्द ८७५८ वेळा आला आहे.
त्रिपिटक, अठ्ठकथा आणि टिका या सर्व ग्रंथांचा एकत्रित विचार केला तर, ‘भगवा’ हा शब्द १७९४२ वेळा आला आहे.
एकीकडे ‘भगवा’ हा शब्द बुद्धांना उद्देशून इतक्या वेळा वापरला गेला आहे आणि दूसरीकड़े तो शब्द एक रंगाचा द्योतक आहे. या दोन गोष्टींचा एकमेकींशी अत्यंत जवळचा संबंध आहे. विविध गुणांनी संपन्न या अर्थाने वापरला जाणारा भगवा हा शब्द गोतम बुद्धांचा द्योतक होता.
त्यांचे चीवर म्हणजे भिक्खुंनी वापरावयाचे वस्त्र रंगीत होते. बौद्ध भिक्खुंचे चीवर ज्या ज्या रंगामध्ये असते, भगवा हा एक महत्वाचा रंग आहे. गौतम बुद्धांना उद्देशून वापरला जाणारा भगवा हा शब्द काळाच्या ओघात लक्षणेने त्यांच्या चीवराचा रंग दर्शविण्यासाठी वापरला जाऊ लागला आणि मग 'भगवा' हा शब्द एका रंगाचा द्योतक बनला.
.गोतम बुद्धांना पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच वैदिकांनी भगवा हा शब्द स्वीकारुन तो आपल्या संस्कृतीचा एक मानबिंदु बनवला
आणि
गोतम बुद्धांवरील प्रेमामुळे भगव्या रंगाविषयी आदर असलेला बहुजन समाज नकळत वैदिक संस्कृतीशी जोडला गेला, हळुहळु बुद्धांपासून तुटून वैदिकांच्या बंधनात अधिकाधिक अडकत गेला. (बुद्धाशिवाय पर्याय नाही)
(डॉ. आ. ह. साळुंके)
।।इपितो सो भगवा अरहंत।।
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत