देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

छावा चित्रपटाच्या निमित्ताने……

छत्रपती शिवाजी महाराजांचा गुढगी या अगम्य रोगाने (ज्या रोगाने त्याआधी आणि त्यानंतर कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही अशा रोगाने) वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी आकस्मीत मृत्यू झाल्या नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र या न्यायाने शंभू राजांना गादीवर बसवून त्यांचा राज्याभिषेक करण्या ऐवजी त्यांना बंदी बनवून अटक करण्याचा व पोरसवद्या राजाराम महाराजांना गादीवर बसवून स्वराज्याचा सगळा कारभार हातात घेण्याचा डाव कुणाचा? आणि त्यांनी असे का केले? यामुळे संभाजी महाराजांनी कुणा कुणाला हत्तीच्या पायी देऊन ठार मारले? व का? त्याचा बदला गनिमांनी कसा घेतला? संभाजी महाराजांना मोघलाना पकडून देण्यासाठी खरे प्रयत्न कुणी केले? त्यामागची कारणे काय? त्यांना संगमेश्वरला कुणी व का बोलावले? ते तिकडे येत आहेत याची खबर मोघलांना कुणी दिली? आजही संगमेश्वरचा तो भाग कुठल्या लोकवस्तीचा भाग आहे? तिथून काय काय चालते?

संभाजी राजांची धोका देऊन अटक ते त्यांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या यात तब्बल ४० दिवसांचा दीर्घ काळ होता. या दरम्यान त्यांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न कुणी केले? नसतील तर का नाही? त्यांच्या हाताखाली एकही शूर, मुत्सद्दी, बहाद्दूर सरदार नव्हता काय?
बरं….. संभाजी महाराजांना दिलेला मृत्युदंड हा तंतोतंत मनुस्मृतीच्या कायद्या नुसार का दिला गेला? हा योगायोग आहे काय? यापूर्वी किंवा यानंतर औरंगजेबने कुणाला असा भयावह मृत्युदंड दिला होता काय?

संभाजी महाराजांचा अमानवीय छळ करून खून करणाऱ्या मुघलांची मुघलशाही येण्या ऐवजी स्वराज्यात हळूहळू पेशवाई कशी आली?

संभाजी महाराजांवर धर्म परिवर्तनाची जबरदस्ती केली व ती त्यांनी झिडकारल्या मुळे त्यांना मृत्युदंड दिला असा इतिहास सांगून संभाजी महाराजांना धर्मवीर ठरवणाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की; संभाजी महाराजांबरोबरच त्यांचे पुत्र शाहू, व राणी यांना सुद्धा अटक केली होती. मग औरंगजेबाने त्यांच्यावर धर्म परिवर्तनाची जबरदस्ती का केली नाही? उलट त्यांची सन्मानाने काळजी घेऊन, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून नंतर त्यांना सन्मानाने सोडण्यामागे औरंगजेबाची काय मनशा होती?

बरं…. संभाजी राजांना बेवडा, बाईलवेडा, बाई आणि बाटलीत आकंठ बुडालेला, नाकर्ता अशी शेलकी विशेषणे लाऊन त्यांची येथेच्छ बदनामी कुणी व का केली?

प्रत्येक शिवप्रेमीने या प्रश्नांची खरी उत्तरे शोधावीत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!