लोकसभा-विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ताकदीने लढविणार-अण्णासाहेब कटारे(राष्ट्रीय अध्यक्ष)

‼️लोकसभा-विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ताकदीने लढविणार-अण्णासाहेब कटारे(राष्ट्रीय अध्यक्ष)‼️
त्रंबकेश्वर(प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचीही घोषणा अण्णासाहेब कटारे यांनी केली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ज्या-ज्या मतदार संघात ताकद आहे व कार्यकर्त्यांची भक्कम
अशी फळी आहे असे मतदारसंघ लढविणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
नाशिक,रामटेक,शिर्डी,उत्तर मध्य मुंबई या लोकसभेच्या मतदार संघावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असेही ठरवण्यात आले. त्याचबरोबर काही विधानसभेच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या.
“We are repubilcan”(आम्ही रिपब्लिकन) हे अभियान पक्षाने प्रभावीपणे राबविले असून सर्वच समाज घटक या अभियानाला प्रतिसाद देऊन पक्षात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.
कोअर कमिटी बैठकीत
राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव गणवीर,राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे,मराठवाडा प्रदेश अध्यक्ष संतोष जी मोकळे,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे,युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपीन कटारे,महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे,ठाणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल दादा चौधरी,मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपक जी भालेराव,औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष संदीप दादा गायकवाड, ठाणे उत्तर भारतीय आघाडी नारायण जी पांडे,ठाणे युवा शहर अध्यक्ष साईनाथ भाई खरात,युवा नेते प्रशांत कटारे,नाशिक शहर संघटक सागर जाधव,तालुका अध्यक्ष किरण गायकवाड,महिला आघाडी नाशिक मीना ताई भालेराव,ठाणे महिला आघाडी रंजना ताई कदम,उपाध्यक्ष दिपाताई ताई जाधव,वंदना पतंगे,मुंब्रा उज्वला कापडी,इगतपुरी आनंद सोनवणे,सचिन मोंढे,पोपट मोंढे नाशिक ग्रामीण,निफाड तालुका मनोहर बनसोडे,येवला तालुका तुषार भाऊ वाघ,नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत शिंदे,नाशिक ग्रामीण भीमराव मोरे,जयंत पालवे,काळू पालवे,ठाणे नेते प्रकाश कदम,दुबेजी,राजेंद्र भालेराव.
आदी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत