बनावट संदेशांपासून सावध राहावे,असे ट्रायचे आवाहन

दूरसंचार नियामक ट्रायच्या नावानं पाठवल्या जाणार्या बनावट संदेशांपासून लोकांनी सावध राहावं,असं आवाहन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण,ट्रायनं केलं आहे. ट्राय कोणत्याही वैयक्तिक टेलिकॉम ग्राहकाचा कोणताही मोबाइल नंबर ब्लॉक अथवा डिस्कनेक्ट करत नाही,असं आज एका निवेदनात म्हटलं आहे.फसवणूक झालेली व्यक्ती संबंधित सेवा प्रदात्यांसोबत थेट संबंधित ग्राहक सेवा केंद्र क्रमांकावर हे प्रकरण मांडू शकतात.ते अशा घटनांची तक्रार नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर देखील करू शकतात किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करू शकतात,असं ट्रायनं निवेदनात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत