एएनएमच्या विद्यार्थिनींची अचानक प्रकृती खालावली

भंडारा : शासकीय परिचारिका वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही विद्यार्थिनींना शनिवारी सुटी देण्यात आली. तर ७ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.
विषबाधेतून त्यांची प्रकृती खालावल्याची शक्यता असून रुग्णालय प्रशासनाने मात्र विषबाधा नसल्याचे सांगितले आहे.शहरात शासकीय परिचारिका वसतिगृहात जीएनएम व एएनएमच्या विद्यार्थिनी राहतात. शुक्रवारी काही विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी आणखी काही विद्यार्थिनींची चौकशी केली असता त्यांनाही अस्वस्थ वाटू लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनाही सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर शनिवारी सकाळी ३३ विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली. तर प्रकृती खालावलेल्या ७ विद्यार्थिनींवर अजूनही उपचार सुरू आहे.
एकाचवेळी ४० विद्यार्थिनी आजारी पडल्याने खळबळ उडाली होती. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सर्व विद्यार्थिनींच्या विविध तपासण्या केल्या. त्यात निगेटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली. विषबाधेची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. तर हा प्रकार विषबाधेचा नसून व्हायरल असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत