मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली – विजय वडेट्टीवार…

मुंबईत आज ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधी नाही. मात्र, असून, आरक्षणाचं श्रेय घेण्याच्या लढाईत ओबीसी समाज उद्ध्वस्त करण्याचं पाप राज्य सरकार करत आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर इथं ओबीसींची विराट सभा आयोजित केली आहे, असं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षणावर त्यांनी आक्षेप नोंदविला. या अधिसूचनेवर ओबीसी समाजातल्या बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवावेत, असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत