पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

नऊ पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांना विशेष राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले दर्पण दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. दर्पण दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले इथे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले इथे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचं वितरण करण्यात आले. अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त शहरातल्या उल्लेखनीय कामगिरी करणार्या ४ पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. सातारा आणि नांदेड मधेही पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेवेळी आलेल्या पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे विविध पुरस्कारांचं वितरण आझाद मैदानातील पत्रकार भवनात करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथे जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
नांदेड इथल्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकारिता ही नेहमीच समाज हिताची असली पाहिजे असे मत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी व्यक्त केले आहे. लातूर इथं जिल्हा माहिती कार्यालयात उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते तर बीड इथं प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जांभेकर यांना आदरांजली अर्पण केली.
धाराशिव इथे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. पत्रकारांनी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान पत्रकार संघाच्या वतीनं काल आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले, यात सुमारे १७७ जणांची तपासणी करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत