गोरेगावात ॲट्रॅासीटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल..

सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे Event कंपनी मध्ये Marketing Executive या पदावर रूजू झाला होता ३ दिवस काम केले त्यानंतर १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकांकडून या तरूणाला Whatsapp च्या संभाषण द्वारे विचारण्यात आले की तु जयभीम वाला है क्या. तो मुलगा हो बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले की Me Actually jai Bhim Wale ko job pe nahi rakhti hu…
या घटनेनंतर संबंधित मालका विरोधात Atrocity &Protection of civil Rights या कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आजही अशा पध्दतीने मुंबईसारख्या महानगरात जातीवरून उच्च शिक्षित तरुणासोबत भेदभाव केला जातोय मुळात हि घटना आंबेडकर जयंतीच्या दिवशी घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तरुणांनी दुसऱ्या दिवशी उघडकीस आली….
या वेळी ॲड. दिपक सोनावणे, बुध्दभूषण शिंदे, संजय किर्तीकर, बाबा शिंदे, संतोष गंगावणे, संदेश सोनवणे, विवेक शिर्के, तसेच पिडीत कुटुंबातील सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते…
(गोरेगाव पोलिस ठाण्याचे विशेष आभार)
टिप. (फिर्यादीची नाव आणि ओळख जाहीर केली नाही)
ॲड.दिपक सोनावणे
सामाजिक कार्यकर्ता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत