पोहळे येथील बुद्ध लेणी उद्ध्वस्त होणार का?

डॉ .सुभाष के देसाई
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध ज्योतिबा देवस्थानाच्या जवळ डोंगर रांगांमध्ये मसाईच्या पठारावर आणि पोहळे गावच्या हद्दीमध्ये फार सुंदर बुद्ध लेणी आहेत त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आत मध्ये चिखल साठलेला होता आणि अज्ञानामुळे काही लोकांनी बुद्ध चैत्य फोडून त्याची शिवपिंड बनवलेली होती याबाबत पुरातत्त्व विभागाकडे तक्रारही दाखल झाली आहे पण याबाबत शासन उदासीन आहे
ही लेणी प्राचीन असून तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे भारतीय संस्कृतीचा तो अनमोल ठेवा आहे आता असे समजते की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कडील जमिनीमध्ये ही लेणी येतात आता या लेण्यासह एका श्रीमंताला ही जमीन देवस्थानने काही अटीवर दिलेली आहे या झालेल्या खाजगीकरणामुळे बुद्ध विचाराचे सारे चिंतित असून त्या ठेकेदाराने जवळच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या लेण्यांची प्राचीनता लयाला जाईल आणि ती उध्वस्त होतील अशी लक्षणे दिसू लागल्यामुळे या भागातील ग्रामस्थ चिंतित आहेत याबाबत माननीय जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी यांनी लोक भावनांची कदर करावी आणि ती लेणी कोल्हापूर जिल्ह्याचा मौलिक ठेवा म्हणून जतन करावीत.
डॉ .सुभाष के देसाई कोल्हापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत