MIM पक्षाचा अमरावती मतदार संघात आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा – असदुद्दीन ओवेसी.

छत्रपती संभाजी नगर : वैजापूर तालुक्यातील MIM पक्षाचे लोकसभा 2024 चे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार सभेत काल पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसि यांची जाहीर सभा झाली.
संविधाना वर होणारे हल्ले खपवून न घेणाऱ्या उमेदवारांना लोकसभेत पाठवणे गरजेचे आहे त्यामुळे अमरावती येथे आपला पक्ष आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देत आहे, आनंदराज आंबेडकर यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन अमरावतीकरांना असदुद्दीन ओवेसी यांनी केली. भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. मतदारांनी त्यांना मतदान करावे असे आवाहन ओवेसी यांनी केलं.
इतर सर्व विरोधी पक्षांवर बोचरी टीका करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या सहकारी पक्षावर मात्र टीका करणे टाळले. यामुळे एमआयएम वंचितच्या मैत्रीसाठी आजही अपेक्षा ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत