महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

संख्येने कमी असूनही सत्तेत कसे ?

पूर्ण वाचा नक्की कळेल..

ढोकळा

100 मुलांच्या क्षमतेच्या एका वसतिगृहात दररोज सकाळी ब्रेकफास्टला #ढोकळा दिला जायचा..

त्या 100 मुलांपैकी 80 मुलं रोज तक्रार करायची की #ढोकळ्या ऐवजी काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट बनवावा. पण, इतर 20 मुलं #ढोकळ्याच्याअथांग__भक्तीत_बुडालेले होते. उरलेल्या 80 मुलांना #ढोकळ्या व्यतिरिक्त काहीतरी दुसरं हवं होते.

गोंधळ खूप वाढला म्हणून वसतिगृहाच्या रेक्टरने मतदान घ्यायचं ठरवलं.. यानुसार, ज्या पदार्थाला सर्वाधिक मते पडतील, तो ब्रेकफास्टसाठी ठेवला जाईल असे ठरले.

लगेचच #ढोकळा विरोधी विद्यार्थ्यांनी एक #आघाडी स्थापन केली.

मतदानच्या वेळी #ढोकळा_प्रेमी 20 मुलांनी अचूक मतदान केले. उर्वरित 80 जणांनी खालीलप्रमाणे मतदान केले.

18 – मसाला डोसा
16 – आलू परोटा आणि दही
14 – रोटी आणि सबजी
12 – ब्रेड आणि बटर
10 – नूडल्स
10 – इडली सांबार

त्यामुळे, मतदानाच्या निकालांनुसार, #ढोकळ्याला सर्वाधिक मते मिळाली आणि पुन्हा दररोज तोच #ढोकळा ब्रेकफास्टला दिला जाऊ लागला.

थोडक्यात :

जोपर्यंत 80% जनता स्वतःपुरता विचार करून निर्णय घेणारी, विभाजित आणि विखुरलेली आहे, तोवर 20% आपल्यावर राज्य करत राहतील..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!