निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्वीटरवर लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे , 20 मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सोलापूर, माढा, सातारा, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने ट्वीटरवर लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार

हिंगोली – डॉ. बी.डी चव्हाण
लातूर – नरसिंह राव उदगीरकर
सोलापूर- राहुल काशीनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारसकर
सातारा – मारुती धोंडीराम जानकर
धुळे – अब्दूर रेहमान
हातकंणगले- दादागुड्डा पाटील
रावेर – संजय ब्राह्मणे
जालना – प्रभाकर भाकले
मुंबई उत्तर-मध्य अबूल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – काका जोशी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!