महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

शौर्यदिनानिमित्ताने

अनिल खरात लिंगेकर
7620520415

सर्वाना शौर्य दिन व नववर्षाच्या प्रथमता खुप खुप शुभेच्छा….!
बांधवानो आज उजाडलेल 2024 हे वर्ष म्हणजे देशात परिवर्तन घढवणार वर्ष आहे…आणि महाराष्ट्रात तरी 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही…
का बर? या 2024 मध्येच परिवर्तन घढणार ? होय जरुर घढणार ! पण केव्हा घढणार ..जर आपण आपल्याच बापाची पैदास असू तरच हे परिवर्तन घढणार म्हणजे घढणार..
कारण 1924 ला आपले उद्धारकर्ते…आपला एकमेव बाप अर्थात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी एका ठिकाणी म्हटले होते कि मी माझे झाड खडकावर लावलेले आहे..अण या झाडाला तब्बल शंभर वर्षानी फळे यायला सुरुवात होईल..आणि ते फळे एवढे गोड असतील कि त्याचा विचारही करता येणार नाही…..आणि म्हणूनच माझ्या बहूजन बांधवानो त्या महामानवांच्या उदगाराला आज 2024 ला शंभर वर्ष पुर्ण होत आहे…अण बाबासाहेबानी केलेल विधान कदापीही खोट ठरणार नाही….ही काळ्या खडकावरची रेघ आहे..
कारण बाबासाहेबांच्या नातवाने अर्थातच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरानी इथल्या वंचित बहूजनाला अगदी सत्तेच्या दारापर्यंत आणून उभ केलेल आहे…आणि आता फक्त दरवाजा लोटून ती खुर्ची तुमची वाट बघत आहे…पण माझ्या भावानो यासाठी तुम्हा आम्हाला जिवाच रान करुन आपण आपल्याच बापाची औलाद आहोत ..आल्या गेल्याची नाही.. हे सिद्ध करन्यासाठी सर्वानी आपल संविधान वाचवन्यासाठी …आपले अधिकार, आपले हक्क वाचवन्यासाठी फक्त आणि फक्त वंचित बहूजन आघाडीलाच मतदान करुन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराना खुर्चीवर बसवायच आहे…पुन्हा एकदा डोक वर करु पहात असलेली पेशवाई गाढून टाकायची असेल तरच आपल्याला आता एका जुटीची अण एका मुठीची गरज आहे…..
आजच्याच दिवशी अन्यायाला चिडून ढुंगाचा झाडू अण गळ्यातल मडक कायमचच काढून फेकन्यासाठी १ जानेवारी १८१८ ला सिद्धनाक महाराने आपल्या जातीचे जिगरबाज एकाच बापाच्या औलादीचे पाचशे शुरविर महाराना एकत्र करुन पेशव्यांचा माज जिरवला होता..अण आपणही त्याच महारांचे वंशज आहोत हे विसरता कामा नये. ..म्हणून ..आपल्या त्याच लढवय्या पुर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन जर आपण एक झालो तर येणारे दिवस हे नक्कीच बा..भिमाने लावलेल्या झाडाचे ते गोड फळे खान्यास पात्र ठरु….बांधवानो सिद्धनाक महार आपल्या शौर्यबाज महार सैनिकांच्या संगतीने जरी हातात तलवारी घेऊन लढले होते ..पण आज आपल्याला हातात तलवार घ्यायची सध्या तरी गरज भासत नाही ..आपण फक्त मतदानरुपी एकत्र होऊन वंचित बहूजन आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा निवडून आनावा म्हणजे विजय आपलाच असणार….! आणि मग हीच खरी आपल्या बापाला म्हणजेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकराना व १ जानेवारीला भिमाकोरेगावात पेशव्यांच पाणीपत करणाऱ्या त्या पाचशे महाराना खरी सलामी ठरेल…….!
आणि म्हणूनचा म्हणावस वाटत कि उठ बहूजना आता तरी जागा हो…..!
डोक वर काढणा-या मनस्मृतीला गाढन्यासाठी बा..भिमाच्या विचारांचा खरा तु धागा हो…..!
मित्रहो आपल्यासाठी खरोखरच रात्र काळोखाची तर दिवस हा वै-याचा आहे….म्हणून जाग असावं…
अरे हे जाग असाव …माझ्या भिमाच पिल्लु हे जाग असावं…..
माझ्या बहुजन बांधवानो झोपेच सोंग घेऊन ऐ-या गै-याच्या दावणीला बांधल्या गेलेल्यानो ..आंबेडकर घरान्यासोबत या…यातच सर्वांच हित आहे…देशातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे…लोकशाही संपऊन लवकरच पेशवेशाही सुरु होण्याच्या मार्गावर आहे..या पेशवेशाहीला नेस्तानाबुत करन्यासाठी सज्ज व्हा….एकतर मतदानाच्या माध्यमातून आपल्याला संविधान वाचावायच आहे ..अण त्यात अपयशी ठरलोच तर भिमाकोरेगावच्या त्या आपल्या पुर्वजांच्या तलवारीला घासून ठेवा…अण जातीवाद्याना गर्जुन सांगा कि आम्ही भिमाकोरेगावच्या त्या तलवारी फेकुन दिल्या नाहीत तर त्या फक्त बाजुला ठेवल्यात …मग विचार करा संविधानाला संपवन्याचा प्रयत्न थांबवा अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल.. खबरदार…शेवटी मग आर या पार
दुसरे भिमाकोरेगाव करन्यासाठी बाबासाहेबांच्या वाघानो तयार राहा….
ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत ..आपण आपल्या अंगाचा चमडा काढून जरी त्या महामानवांच्या चरणी अर्पण केला तरीही ते उपकार फिटणारे नाहीत….म्हणून त्या महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घरान्याशी एकनिष्ठ राहून बाबासाहेबांचे नातू जे कि आपल्या आजोबाप्रमानेच या रंजलेल्या गांजलेल्या सर्व जाती धर्माच्या मानवासाठी निस्वार्थपणे लढत आहेत त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराना तन मन धनाने साथ द्या ….
बस तुर्तास…शौर्यदिनानिमित्ताने एवढेच…..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!