महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

मथुरा ही श्रीकृष्णाची नगरी नसून तथागत बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांचा बालेकिल्ला होता.. !

मथुरा जर भगवान श्रीकृष्णाची आहे तर मग तिथे भगवान श्रीकृष्णाची एकही मूर्ती उत्खननामध्ये न सापडता भगवान बुद्ध यांच्या मुर्त्या का सापडतात ?

मथुरा येथे हेनसांग याला तथागत बुद्ध यांच्या अगोदर होऊन गेलेल्या चार बुद्धांचे चिन्ह सुद्धा दिसल्याचे नोट्स मध्ये नमूद आहे..

मथुरेला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. भगवान श्रीकृष्ण इतका मोठा पराक्रमी राजा आणि त्यातही तो विष्णूचा अवतार होता. तर मग मथुरेला प्रचंड श्रीकृष्णाची मंदिरे त्याच्या मुर्त्या त्या वेळच्या लोकांनी निर्माण केल्या असणाराच ?

मग उत्खनन झाले तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची 5000 वर्षांपूर्वीची तर सोडून द्या 3000 वर्षांपूर्वीचीही एकही मूर्ती सापडलेली नाही. या उलट तेथे तथागत बुद्ध यांच्या मुर्त्या असंख्य स्तुप सापडलेले आहे.

यावरून सिद्ध होते मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची नसून तथागत बुद्ध यांची आहे. मथुरा ही पूर्ण बुद्धमय होती, यावरून सिद्ध होते या देशातील प्रत्येक नागरिक हा बुद्धाचा वंशाचा आहे. ज्यांना हे मान्य नसेल ते विदेशी आहेत.

सातव्या शतकात हेनसांग जेव्हा भारतात येऊन तो मथुरेला गेला तेव्हा त्याला तिथे 20 बुद्ध विहारे आणि त्यामध्ये राहणारे 2000 भिक्खू दिसले की जे हीनयान आणि महायान पंथाचे होते. अशोक सम्राट यांनी बांधलेले 3 स्तूप सुद्धा हेनसॉंगला दिसले. मागे होऊन गेलेल्या प्रत्येक 4 बुद्धांचे अनेक चिन्ह सुद्धा त्याने तिथे पाहिले. छोटे छोटे तर असंख्य तूप सुद्धा तिथे होते.

यावरून सिद्ध होते मथुरा ही श्रीकृष्णाची नसून तथागत भगवान बुद्धाची आहे. जागे व्हा भारतीयांनो आपला इतिहास ओळखा तुमचा पूर्वज बुद्ध आहे. पराक्रमी अशोक सम्राट यांचे तुम्ही वंशज आहात. हा तुमचा इतिहास ब्राह्मणवादी नष्ट करीत आहे.

प्राध्यापक गंगाधर नाखले
दि.06/03/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!