छत्रपती शिवाजी महाराज

कविता- अनिल जगन्नाथ जातक
छत्रपती शिवाजी महाराज
शूर मर्द मराठा आपला महाराजा
त्याचा जगभर गाजावाजा
परस्त्री ज्याच्यासाठी माय बहीण व आईं
त्याच्यासारखा दुसरा राजा होणे नाही
देश धर्मासाठी दिली बालपण आणि जवानी
मराठा राज्य स्थापन करण्या स्वतः उतरला मैदानी
राजा तो चारित्र्यसंपन्न योद्धा शस्त्रधारी
ज्याच्यामुळे राहिला धर्म जिवंत सुरू आहे पंढरीची वारी
पून्हा पुन्हा दर्शन व्हावे
महाराज आपण परत यावे||१||
डोळयात त्याचा कधी भीती न दिसली
पापणी कुणासमोर कधी ना झुकली
मा साहेबांचा आदेश अंतिम
पुरता येडा झाला होता गणीम
जन्म घेतला आया-बायांची अब्रु राखाया
साधूसंत मंदिरे रक्षिण्या हिंदू राष्ट्र उभे कराया
इमान राखणारे संताजी धनाजी हंबीर नेताजी
तेंव्हा बनले स्वराज्य म्हने वीर शिवाजी
पून्हा पुन्हा दर्शन व्हावे
महाराज आपण परत यावे||२||
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं
मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य तोरण बांधंल
बाजीप्रभू शिवा काशिद वीर तानाजी फर्जंद
असे जीव ओवाळून टाकणारे वीर होते शिवबासोबत हजारांवर
इमाने इतबारे राष्ट्रधर्म जपला
गद्दार गणीमासी उभा कापला
राजांसाठी सर्वधर्मसमभाव होते मुघलांमधले हिंदुत्वाचे वैरी ते जाणूनिया होते
पून्हा पुन्हा दर्शन व्हावे
महाराज आपण परत यावे||३||
जन्म झाला देवाचा तो पावन किल्ला शिवनेरी
अंतिम दर्शन घडले रायगडी
रात्रंदिन त्यासी युद्धाचा प्रसंग
होता जीव ओवाळून टाकणाऱ्या मावळ्यांचा संग
संपविले जुलमी अन्यायी अत्याचारी
छत्रपती शिवबाला पुजिते जनता घरोघरी
विरांसोबत आयाबायांना मान होता होता
महाराजा आमचा महान होता
पून्हा पुन्हा दर्शन व्हावे
महाराज आपण परत यावे||४||
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत