“माना आदिवासी” समाजाचं विद्यार्थ्यांच्या जात पडतळणीसाठी आंदोलन

आदिवासी जिल्हा असलेल्या गोंदिया मध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत माना आदिवासी समाजानं आज आंदोलन केलं. जयस्तंभ चौक ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पुढील शिक्षण सुलभ व्हावे, आरक्षण, वसतिगृह, शिष्यवृत्ती साठी अनिवार्य असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी विद्यार्थ्यांना क्षुल्लक त्रुटी दाखवून परत पाठवले जात आहे. जात वैधता नाकारली जात आहे त्यामुळे माना आदिवासी समाजातले हुशार होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, असा आरोप या समाजानं केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत