पैनगंगा नदीच्या पुलावर काही अज्ञातांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली

नांदेड वरून नागपूरला जात असलेली नांदेड आगाराची एसटी बस [ एम एच २० -जीसी ३१८९] उमरखेड जवळ पैनगंगा नदीवरील पुलावर काही अज्ञातांनी पेटविल्याने खळबळ उडाली आहे . सुदैवाने बस मधील सर्वच ७३ प्रवाशी खाली उतरल्याने अनुचित घटना घडली नाही . नांदेड – नागपूर बस नांदेड वरून रात्री नऊच्या दरम्यान निघाली होती. रात्री ११ च्या दरम्यान बस यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत येत असताना उमरखेड तालुक्यातील गोजेगाव जवळ पैनगंगा नदीच्या पुलावर बस येताच मोटारसायकलवर येणाऱ्या काही जणांनी बस थांबविली . बसचा चालक बी .डी. नाईकवाडे यांनी बस थांबवली असता काही जण बसजवळ धावत आले . काही तरी विपरीत घडणार असल्याचे लक्षात येताच बस मधील सर्च च ७३ प्रवासी बस मधून खाली उतरले . सर्व प्रवासी ,बसचा चालक , वाहक खाली उतरताच त्याठिकाणी असलेल्या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली .
काहीवेळातच बस जाळून खाक झाली . रस्त्यातच बस पेटल्याने नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक बंद पडली . घटनेची माहिती मिळताच नांदेड व उमरखेड येथील एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले .उमरखेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . रात्री उशिरा बस रस्त्याच्या बाजूला केल्यावर वाहतूक सुरु झाली . बस पेटविणारे अज्ञात लोक कोण होते याचा शोध पोलिस घेत आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत