महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री महोदयांची भेट.

दिल्ली, दिनांक 03 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे एक शिष्टमंडळ मा. मंत्री रामदासजी आठवले यांना भेटून महाबोधी बुद्ध विहार, बुद्धगया मुक्त करण्याच्या दृष्टीने व अबौद्धांच्या ताब्यातून भिक्खू संघाच्या व्यवस्थापनामध्ये देण्याबाबत सविस्तर चर्चा केली शिष्टमंडळामध्ये भदंत करुणानंद महाथेरो-संघनायक, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो-अध्यक्ष, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष व समन्वयक आयु. आर. आनंद, दिल्ली इत्यादी उपस्थित होते.
दुसऱ्या एका बैठकीत मा. चिराग पासवान, मंत्री खाद्य व औद्योगिक, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या ‘पंचशील भवन’ निवासस्थानी सुद्धा बुद्धगया विहाराच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मी कायदामंत्री यांच्यासोबत चर्चा करून पुढील मार्ग कसा काढता येईल त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा. जरूर आपण या विषयात मार्ग काढू असे अखिल भारतीय शिष्टमंडळाला मंत्री महोदयांनी आश्वासित केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत