भारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

जर वडिलांच्या जमिनीवर मुलाने किंवा मुलीने घर बांधले तर कोणाला मिळणार मालकी हक्क ?

वाचा सविस्तर

जमिनीचे आणि प्रॉपर्टीचे विवाद खूपच जटील असतात.
प्रॉपर्टीच्या विवादामुळे भावंडांमध्ये वादविवाद पाहायला मिळतात. अनेकदा हे वादविवाद भांडणात परावर्तित होतात.
कित्येकदा तर प्रॉपर्टीच्या कारणावरून हाणामारीच्या घटना होतात.
काही प्रकरणात प्रॉपर्टीच्या कारणांमुळे खून देखील होतात.

अनेकांना संपत्ती बाबतच्या कायद्याविषयी परिपूर्ण माहिती राहत नाही.
यामुळे संपत्तीमुळे वाद पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आज आपण संपत्तीच्या कायद्यात असलेल्या एका महत्त्वाच्या बाबीविषयी माहिती पाहणार आहोत.

आज आपण जर वडिलांच्या जमिनीवर मुलाने किंवा मुलीने घर बांधले तर अशा प्रॉपर्टीवर नेमका अधिकार कोणाचा राहील ?
वडिलांचा राहिल की मुलाचा राहील
हे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर समजा एखाद्या मुलाने वडिलांच्या जमिनीवर घर बांधले आणि याबाबत वाद झाल्यास त्यावर मालकी हक्क कोणाचा असेल ? पिता-पुत्र यांच्यात वादाची अशी परिस्थिती क्वचितच उद्भवत असेल.

पण, अशी परिस्थिती जर तयार झालीच तर ती मालमत्ता ज्याने घर बांधले आहे त्याची होणार की ज्याच्या नावावर जमीन आहे त्याची होणार ?
याबाबत आज आपण तज्ञांनी काय माहिती दिली आहे हे पाहणार आहोत.

मालमत्ता प्रकरणातील तज्ज्ञ सांगतात की, मालमत्ता कायद्यानुसार जमीन जर एखाद्याच्या नावावर असेल तर त्यावर कोणीही बांधकाम करू शकत नाही.

याचा अर्थ जमिनीवर ज्या व्यक्तीचा हक्क आहे,
म्हणजेच ज्याच्या नावावर जमीन नोंदणीकृत आहे, त्यालाच मालकी हक्क मिळतो.

म्हणजे जर जमीन वडिलांच्या नावावर असेल आणि त्यावर मुलाने किंवा मुलीने घर बांधले तरी ती मालमत्ता वडिलांच्याचं मालकीची राहील.

पण कायद्यात जर मुलाने घर बांधण्यासाठी पैसे खर्च केले असतील तर तो खर्च केलेल्या पैशावर दावा करू शकतो,
असे म्हटले गेले आहे. म्हणजे वडील हयात असेपर्यंत त्या घरावर दुसरा कोणी हक्क सांगू शकत नाही.

जमीन वडिलांच्या नावावर नोंदणीकृत असल्याने त्यावर बांधलेले घरही कायदेशीररित्या वडिलांचेच राहणार आहे. फक्त ते घर बांधण्यासाठी जो पैसा खर्च झाला असेल त्यावर दावा करता येणार आहे.
ते पैसे परत करतात की नाही हे देखील वडिलांच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!