निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

राज साहेबांचीही दिल्ली वारी.. चर्चांना उधाण

नवी दिल्ली : एकही खासदार नसलेल्या परंतु मुंबई नाशिक या मतदारसंघा वर चांगली पकड असलेले हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते आणि मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्लीसाठी रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र आपण इथे फक्त अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.

काही दिवसांपुर्वी मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मनसे आणि आमच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत असल्याचे भाजप नेते वारंवार सांगत आले आहेत.असे असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणांतून सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर उघडपणे टीका करत आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे ‘एकला चलो’ची भूमिका घेतील, असेही वाटले होते. पण राज ठाकरे अचानक दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्याने भाजपसोबत युतीच्या चर्चेला वेग आला आहे.

राज ठाकरे दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे असे राज्यातील महत्वाचे नेतेही उपस्थित आहेत. यासोबत राज ठाकरेंना या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

आपल्या रोख ठोक भूमिकेसाठी प्रसिध्द असलेले राज ठाकरे हे ही दिल्ली वाऱ्या करू लागले आहेत हे पाहून सर्वसामान्यांना राजकीय क्षेत्रात सगळेच बिन बुडाचे चंबू असतात, कधी कुठे लुडकतील काय सांगता येत नाही असा समज वाढत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!