भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

देशभरातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पराक्रम दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. नेताजी यांचे असामान्य धैर्य आणि प्रभाव याने भारतीयांना वसाहतवादा विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पराक्रम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे नेताजी यांचं अजोड समर्पण सतत प्रेरणा देत राहील असे प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. देश नेहमीच त्यांचं कृतज्ञतेनं स्मरण करेल,असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे,केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि अर्जुन राम मेघवाल आणि खासदारांनी आज सकाळी संविधान सदनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे.पराक्रम दिवसाच्या निमित्तानं दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संध्याकाळी सहभागी होतील.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिप्रेक्षात बाळासाहेब ठाकरे यांचा अतुलनीय प्रभाव होता.त्यांचं नेतृत्व,आपल्या आदर्शांप्रती असलेलं समर्पण आणि वंचितांसाठी आवाज उठवण्याची कटिबद्धता, यामुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात कायम राहतील,असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!