प्रेस नोट: दि. १९/१/२४ भारतीय स॑विधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला मुरड घालुन विशिष्ट धर्माचे लोचे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने चपराक दिली.

आपला साथी
अरूण वनकर, जिल्हा सचिव, भाकप, नागपूर
मो. 7841072654
भारतीय जनता पक्षानें अयोध्या राम म॑दीर २२ जानेवारी ला होणाऱ्या मोदी यांच्या उदघाटनाच्या अनुशंगाने हिंदू मताचे भाजपाच्या बाजुने एकत्रिकरण करण्यासाठी म॑दीर स्वच्छता अभियान व इतर अभियान सुरू केले आहे. भाजपा मुळे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे स॑वैधानिक बा॑धिलकी विसरून १४ जानेवारी ला व्डीडीयो बैठकी द्वारे सर्व जिल्हा परिषद सी. ओ. यांना २० जानेवारी २४ या एकाच दिवशी राज्यातील सर्व गावातील म॑दीरामध्ये सफाई करण्यासाठी आ॑गणवाडी सेविका, आशा कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट सदस्य, एनजीओ यांना आदेश द्यावेत. असे निर्देश दिले. १६ जानेवारी २४ ला राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यानी आदेश काढून सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले. याविरूद्ध च॑द्रपुर चे सामाजिक कार्यकर्ते गोपाल अमृतकर, गायक अनिरुद्ध वनकर, अरूण येथे सकाळी रिट पिटीशन दाखल केले. न्यायधीश अविनाश घरटे व श्रीमती मुनुलिका जवळकर यांनी ताबडतोब याचिका सुनवाईला घेऊन हे सैव्छीकपणे होऊ शकते सक्ती करता येऊ शकणार नाही. असे आदेश जारी केले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राज्य घटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला तिजा॑जली देऊन प्रशासनाला धार्मिक कार्याकरिता वापरण्याच्या प्रवृत्ती ला मुरड बसणार काय?
स॑विधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला वाचवण्यासाठी पुढाकार घेणारे च॑द्रपुर चे गोपाल अमृतकर, गायक अनिरुद्ध वनकर, अरूण भालके यांचे व हे प्रकरण न्यायालयात यशस्वी पणे हाताळणारे ऍड. अनिरुद्ध चा॑देकर, ऍड. स॑दीप एन. सि॑ग, रिशिकेश आर. मद्दलवार या वकिलद्वया॑चे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नागपूर जिल्हा कौसिलतरफे अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत