युगांडातील कंपाला इथे सुरू असलेल्या १९ व्या अलिप्ततावादी देशांच्या नाम शिखर परिषदेत ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रातील सुधारणांसह बहुध्रुवीय जगाच्या निर्मितीचे आवाहन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे.प्रादेशिक उत्पादनांच्या वाढीसह आर्थिक विकेंद्रीकरणाच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. परस्परांच्या समृद्ध वारशांचा आदर केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुनर्संतुलनाची आवश्यकताही त्यांनी यावेळी नमूद केली. यातून सुधारित बहुपक्षीयतेला प्रेरणा मिळू शकते असंही त्यांनी नमूद केलं.जगभरात कोठेही होत असलेल्या संघर्षाचे परिणाम सर्वत्र होतात. गाझामधील संघर्ष हे एक मानवतावादी संकट आहे ज्यासाठी शाश्वत उपाय आवश्यक आहे, ज्यामुळं प्रभावित लोकांना दिलासा मिळेल, असंही जयशंकर म्हणाले. दहशतवादाला अजिबात थारा दिला जाणार नाही, असं सगळ्या जगानं स्पष्ट केले पाहिजं असंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा सर्व देशांनी आदर केला पाहिजे आणि संघर्ष देशांतर्गत किंवा देशाबाहेर फैलावणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. आफ्रिकेतील देशांना सदस्यत्व देऊन परिवर्तन घडवणं शक्य आहे हे भारताने आपल्या जी-वीस अध्यक्षपदाच्या काळात दाखवून दिल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. दरम्यान, जयशंकर यांनी काल व्हेनेझुएला, अझरबैजान आणि बोलिव्हिया या तीन देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेऊन परस्पर सहकार्यावर तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत