भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

सत्ता आणि संपत्तीचा समतोल बिघडला !

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

भारतात लोकशाही आहे,पण नावापुरती . निवडणूक पुरतीच.निवडणुकीत ही मोठा घोळ घालून ठेवलेला आहे.मतदान सुद्धा मॉडीफाय करून नोंद होते.माणूस….मशीन…निकाल.या लिंकमधे मशीनची घुसखोरी झालेली आहे.माणूस ज्या उमेदवारांना मत देतो ते त्यालाच पोहचते किंवा नाही?याचा संशय भारतीय मतदारांमधे झालेला आहे.आता तर अनपेक्षित अनुभवावरून वाढीस लागलेला आहे.
मतांमधे मशीनची घुसखोरी फक्त बुद्धिजीवी लोकांना कळते.मुर्खांना कळतच नाही.दुर्भाग्य असे कि, बुद्धिजीवी लोकांपेक्षा मुर्ख लोकांची संख्या दुप्पट आहे.या मुर्ख लोकांना बुद्धिजीवी लोकांची बौद्धिक लागण होऊ नये म्हणून सरकार मधील चाणाक्ष लोक काहीना काही टोमणे, बुजगावणे दाखवून करमणुकीचे कार्यक्रम करीत आहे.यासाठी धार्मिक कर्मकांडे करणे ,स्वर्गाचे प्रलोभन देणे ,पाव फेकून मारणे असे कार्यक्रम करीत आहेत.गरज नसतांना कर्मकांड करणे,शक्य नसतांना नको ती प्रलोभने देणे आणि भुक नसतांना पाव फेकून मारणे यामुळे मुर्ख लोक कायमच सरकार कडे आ वासून उभे असतात.तुम्ही आम्हाला काय देणार? धान्य,साडी,गॅस,घर, शौचालय? सरकार देते.त्यापेक्षा उमेदवार जास्त चतुर आणि व्यवहारी आहेत.ते मताचे रोख पैसे देऊन मोकळे होतात.आज रोख कल उधार!या रोखीवर आयुष्य उधार देणारी माणसे खूप उदार आहेत.ते गुंड, गुन्हेगार,चोरांना उदार मनाने,पैशांशी इमान ठेवून मतदान करतात.मत विकून आपण देशाशी,आयुष्याशी बेईमानी करीत आहोत,हे समजण्या इतकी बुद्धी त्यांचेकडे नाही.याच लोकांमुळे भारतीय लोकशाहीचा नाश होतो.सत्तेचा समतोल बिघडतो.संपत्तीचा समतोल बिघडतो.म्हणूनच दहा टक्के लोक मालामाल आणि नव्वद टक्के लोक कंगाल झाले आहेत.ही परिस्थिती तर राजेशाही आणि हुकुमशाही मधे सुद्धा होती.तर मग, उगीच स्वातंत्र्य मिळवले?उगीच लोकशाहीचा ढिंढोरा पिटला?असे वाटू लागले आहे.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणारे आणि तत्सम लोक आता बाजूला पडलेत.ज्यांनी सत्ता आणि संपत्ती बगलेत एकवटली तेच आता स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवत आहेत.कोणाची हिंमत नाही म्हणण्याची,अरे! हा तर चोर आहे.हा कसा काय ध्वज फडकवत आहे?
स्वातंत्र्य, प्रजासत्ताक,ध्वज याचा अर्थ न समजणारे उदंड झालेत.आता लोकशाहीचा मापदंड मोजण्याची वेळ आली आहे.सत्ता आणि संपत्तीचा समतोल बिघडलेला आहे.सत्ता आणि संपत्तीच्या महापुरात बुद्धिजीवी लोक ओंडका सारखे वाहून जाऊ नयेत.म्हणून तर विचारांचे जाळे आडवे करून त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.कदाचित ईश्वराने ही जबाबदारी आपल्यावर सोपवली असावी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!