दिन विशेषदेशदेश-विदेशभारतमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

आपल्या महार पूर्वजांच्या महान पराक्रमाकडे महारांचे व जगाचे लक्ष वेधणा-या आधुनिक बुध्द डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन!

  • राजेंद्र भास्करराव भोसले.
    मोबा-9922220952/8788717005.
    पुणे,दिनांक 1-1-2024

आपल्या महार पूर्वजांच्या महान पराक्रमाकडे महारांचे व जगाचे लक्ष वेधणा-या आधुनिक बुध्द डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन!

तसेच ज्या महार सैनिकांनी अस्पृश्यतेचा कहर करणा-या क्रूर व जुलमी पेशवाई राजवटीचा नायनाट करून जगातील सर्वात भीषण आणि दाहक गुलामगिरीचा अंत केला त्यांनाही विनम्र अभिवादन!

ज्या इंग्रज राजवटीने महारांच्या अतुलनीय पराक्रमाची दखल घेऊन विजयस्तंभ उभारला व त्यावर धारातीर्थी पडलेल्या महारांची नावे कोरली त्यांचेही आभार! जानेवारी या विजय दिनानिमित्त विजयस्तंभाला माझी मानवंदना!

बाबासाहेबांनी विजयस्तंभाला भेट त्यांच्या उभ्या आयुष्यात फक्त एकदाच म्हणजे 14 मे 1927 रोजी दिली होती.पुण्यात 12 व 13 मे 1927 ला महार शिक्षकांची एक परिषद भरली होती.मल्हारी नानाजी डिखळे गुरूजी, माझे आजोबा भिकाजी गणेश भोसले गुरूजी व सदाशिव मोरे गुरूजी यांनी ही परिषद आयोजित केली होती.या परिषदेला हजर राहून 14 मे 1927 ला सकाळी नगरच्या सभेला जाताजाता मध्येच थांबून बाबासाहेबांनी विजयस्तंभ पाहिला.तात्पर्य,बाबासाहेबांनी विजयस्तंभाला भेट दिल्याची तारीख 1 जानेवारी नसून 14 मे 1927 होती.( संदर्भ- माझे ‘ आमचे बाबासाहेब ‘ हे पुस्तक, पान 17 ते 21.)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!