महाराष्ट्रमुख्यपान

बहुजन विचारमंच सोलापूर आणि संत कबीर बहुद्देशीय समाज सेवा मंडळ सोलापूर वतीने शिवगंगा नगर क्र.4, नई जिंदगी येथील भीमगर्जना विहारात बचत समूहाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापालिकेतील इंजिनियर आयु. अविनाश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. तदनंतर आयु. सर्वोत्तम रणशुर, डॉ. एम डी शिंदे सर, डॉ. अरुणकुमार इंगळे, आयु. अंबादास कदम साहेब, आयु. शाम शिंगे सर, आयु. रत्नदीप कांबळे सर, आयु. अविनाश वाघमारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या नंतर आयु. शाम शिंगे सर यांनी गेल्या तीन वर्षांपासून सोलापुरात बहुजन आर्थिक विकास अभियान अंतर्गत बचत समूहाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन आजवर 17 बचत समूह कार्यरत आहेत याचा विस्तृत आढावा घेतला. मायक्रो फायनान्सच्या जीवघेण्या सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी बचत समूह हाच एक पर्याय आहे, असे प्रतिपादन केले.

त्यानंतर डॉ. एम डी शिंदे सर यांनी बचत समूहाचे महत्त्व आणि या सर्वांना नियंत्रित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशनची माहिती दिली. बचत समूहाच्या कार्यपद्धती बाबत विस्तृत माहिती देऊन या परिसरात बचत समूहाच्या कार्याची सुरुवात करा अशी आग्रहपूर्वक विनंती केली.

त्यानंतर डॉ अरुणकुमार इंगळे यांनी सोलापुरात अनेक छोट्या छोट्या जाती जमातींच्या आर्थिक संस्था आहेत पण बौद्धांच्या आर्थिक संस्था नाहीत. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटित होऊन बचत समूहाच्या माध्यमातून आर्थिक विकास अभियान राबविण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच बचत समूहातून ज्या गरजा पूर्ण होणार नाहीत त्यासाठी नवयान अर्बन निधी लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास शिवगंगा नगरातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिथल्या तिथे महिलांनी 25 संभाव्य सभासदांची सूची तयार केली. सुजाता स्वयंसहय्यता महिला बचत समूहाची स्थापना केली जाणार असल्याचे घोषित केले. तसेच पुरुष बचत समूहाची देखील स्थापना करण्यात येणार असल्याचे घोषित केले.

पुढील बैठक रविवार दिनांक 5 रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयु. चित्रसेन गायकवाड, आयु. सतीश कांबळे आणि भीमगर्जना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आयु. सतीश कांबळे यांनी सर्वांचे मानले.

आर्थिक विकास अभियान राबविण्यात पुढाकार घेतलेल्या कार्यकर्त्यांना आयु. चित्रसेन गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी त्यांच्या घरी आग्रहपूर्वक आमंत्रित करून चहापान देऊन आपुलकीचा स्नेहभाव व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!